रत्नागिरी:- शहराजवळील नाचणे येथे विनापरवाना मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राकेश अनंत चव्हाण (रा. शिरगाव, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता.६) रात्री साडेआठच्या सुमारास नाचणे येथील नवलाई मंदिराच्या समोरिल दोन बंद टपरीच्या मध्य भागात निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाई संशयित मटका जुगार चालवत होता. त्याच्याकडून साहित्यासह ६९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल महेद्र खापरे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला