रत्नागिरी:- गुरुवारी आलेल्या अहवालानुसार 1 हजार 893 चाचण्यांमध्ये जिल्ह्यात 55 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील 24 तासात जिल्ह्यात एकही मृत्यू झालेला नाही.
जिल्ह्यात 24 तासात 52 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 75 हजार 448 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून 96.19 टक्के आहे. नव्याने 55 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 78 हजार 479 इतकी झाली आहे.
मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 440 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.11 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 264 तर संस्थात्मक विलगीकरणात 287 रुग्ण उपचार घेत आहेत.









