खेड:- धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी आरोपी प्रसाद सुरेश भागवत (रा. गणपती मंदिराच्या मागे, पेठमाप, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी ) याला खेड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी एक वर्ष साध्या कैदेची व तीन लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
आरोपी प्रसाद सुरेश भागवत याच्याविरुद्ध विजय छपरे ( रा. खेड ) यांनी ॲड. समीर एस. शेठ यांच्यावतीने खेड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात धनादेश अनादर झाल्याबद्दल खटला दाखल केला होता. मात्र, त्या खटल्याच्या कामी फिर्यादीतर्फे ॲड .समीर शरद शेठ यांनी पुरावे सादर केले. तसेच त्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जैन पी. जोश विरुद्ध संतोष, तसेच रंगाप्पा विरुद्ध श्री. मोहन तसेच बसलिंगप्पा व मोडीबसप्पा असे विविध निकाल दाखल केले. न्यायदंडाधिकारी श्री. चव्हाण यांनी ॲड. समीर शरद शेठ यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला एक वर्ष साध्या शिक्षेची तसेच तीन लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.