Saturday, May 23, 2026
spot_img
Home लांजा दुचाकीवरिल ताबा सुटून स्वार जखमी

दुचाकीवरिल ताबा सुटून स्वार जखमी

रत्नागिरी:- गोवीळ (ता. लांजा) येथील रस्त्यावरुन दुचाकी घेऊन जाणारा भंगार गोळा करणारा प्रौढ दुचाकीवरिल ताबा सुटून पडला. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाबूराम पांचू राजपूत (वय ५८, रा. वैभव वसाहत, लांजा) असे जखमी स्वाराचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ६) सकाळी साडेदहाच्या सुमारास गोविळ रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाबूराम नेहमी भंगार गोळा करण्यासाठी लांजा तालुक्यात फिरत असतात. शुक्रवारी गोविळ येथील रस्त्यावरुन जात असताना अचानक त्यांचा दुचाकीवरिल ताबा सुटून अपघात झाला. त्यांच्या डोक्याला मार लागला. उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले होते. अधिक उपचासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.