रत्नागिरी: शहरातील चर्च रोड येथे किराणा माल व्यापारी रमीझ हजीहबीब आकवानी किराणा व भाऊ वसीम या दोघांवर प्राणघातक हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न झाला. हे दोघेही काल रात्र 9 च्या सुमारास जुने भाजी मार्केट येथील आपले किरणामालाचे दुकान बंद करून आपल्या माजगाव रोड येथील घरी दुचाकीवरून जात असताना ही घटना घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
चर्च रोड येथील गतिरोधक जवळ दुचाकी आली असता पाठ करून उभ्या असणाऱ्या दोन अनोळखी व्यक्तीने अचानक या दोघांवर दांडक्याने हल्ला केला व हातातली पैशाची बॅग पाळवण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात भाऊ वसीम जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबतची तक्रार पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.









