Friday, October 16, 2026
spot_img
Home राजापूर दारूच्या व्यसनाला कंटाळून तरुणाची गळफास लावून आत्महत्या

दारूच्या व्यसनाला कंटाळून तरुणाची गळफास लावून आत्महत्या

राजापूर:- दारूच्या व्यसनाला कंटाळून एका ३४ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील शेजवली (वरचीवाडी) येथे मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

​शेजवली येथील रहिवासी जयेश महादेव राणे (वय ३४ वर्षे) हा दारूच्या आहारी गेला होता. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरातील स्वयंपाकघरामध्ये लाकडी बाराला नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. कुटुंबियांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

​या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात आमृ. क्रमांक ६३/२०२६ (भारतीय नागरिक सुरक्षा संहिता – कलम १९४) अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ६:१९ वाजता पोलीस ठाण्यात या घटनेची अधिकृत नोंद करण्यात आली.