दापोलीत सापडला आणखी 11 हजारांचा गुटखा

 दापोली:- दापोलीत भरवस्तीत गुटखा विक्री करणाऱ्या एकावर कारवाई करण्यात आली. शहरात बुरोंडी नाक्याजवळ असलेल्या फॅमिली माळ परिसरातील मेहता याच्या दुकानावर धाड टाकुन कारवाई करीत 11 हजारांचा गुटखा  जप्त करण्यात आला. याप्रकरणी संशयित श्रीराम विठ्ठल मेहता (वय 58, रा. फॅमिलीमाळ, बुरोंडी नाका ता. दापोली) यांच्यावर कारवाई करण्यात आली. 

 पोलिसांनी केलेल्या कारवाईत ४ हजार ९५० रुपयांचा विमल पान मसाला, ९३५ रु. विमल पान मसाला केसरयुक्त (मध्यम), ९७३ रु. विमल पान मसाला केसस्युक्त (छोटा), २८० रु. विमल पान मसाला केसरयुक्त, ६०० रु. विमल पान मसाला केसरयुक्त आदी माल जप्त करण्यात आला आहे.