दापोलीत युवतीची छेड काढणाऱ्या दोघांचे ग्रामस्थांनी केले मुंडण

दापोली:- खासगी ट्रॅव्हल्सने जाणाऱ्या युवतीचे छेडछाड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांची चांगलाच धडा दिला. छेड काढणाऱ्या दोघांचेही मुंडण करून धिंड काढली. 

साकुर्डे मार्गे विरार मुंबई अशा जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्समधून एक युवती एकटीच प्रवास करत होती. या गाडीत उपस्थित असलेल्या संशयित ड्रायव्हरने व अन्य एकाने त्या मुलीची छेड काढली. त्या युवतीने लगेचच याची माहिती गावात कळवली. गावातील लोकांनी त्या गाडीच्या मागून पाठलाग करत गाडी थांबवली. मुलीने दोघांनी छेड काढली असल्याचे सांगताच वेळवी कादिवली परिसरातील ग्रामस्थांनी त्या ड्रायव्हरला व अन्य एका संशयिताला ताब्यात घेऊन त्यांचे मुंडन करून त्यांना चांगलीच अद्दल घडवली आहे. हा संशयित रायगड जिल्ह्यातील महाड दासगाव येथील राहणारा आहे मात्र या प्रकरणाची दापोली पोलीस स्थानकात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. यावेळी एका बसमालकाच्या संशयित मुलाचेही मुंडन करण्यात आल्याचे कळते.