दापोलीच्या तरुणाचा वाशिष्ठी नदीत बुडून मृत्यू

चिपळूण:- आजोळी आलेला तरुण वाशिष्ठी नदीत बुडाल्याची खळबळजनक घटना शहरातील गोवळकोट-भोईवाडी येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. स्थानिकांच्या शोध मोहिमेनंतर अखोर त्याचा मृतदेह सापडला. अनंत अशोक निवाते (३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा दापोली तालुक्यातील ओणानवसे गावचा असून गोवळकोट येथे आजोळी आला होता.

अनंत निवाते हा होडीमध्ये बसला होता. त्यानंतर तो गायब झाला. तो कुठेच दिसून न आल्याने स्थानिकांच्या मदतीने शोधाशोध सुरु करण्यात आली. अखेर वाशिष्ठी नदीपात्रात सायंकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. विच्छेदनासाठी अनंत निवातेचा मृतदेह कामथे रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.