थिबा पॅलेस येथे इमारतीमध्ये अमली पदार्थ सेवन करणाऱ्या दोघांवर गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील थिबा पॅलेस रोडवरील एका डेअरीच्या बाजुला बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत अमली पदार्थाचे सेवन करणार्‍या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वा.सुमारास करण्यात आली.
बिपअल अमुल्य हालदार (27) आणि बाबू निपेन हालदार (37,दोन्ही मुळ रा.पश्चिम बंगाल सध्या रा.नाचणे,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पोलिस हवालदार प्रशांत पाटील यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी दुपारी दोन्ही संशयित थिबा पॅलेस रोडवरील एका डेअरीच्या बाजुला बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत गांजा सदृश्य अमली पदार्थाचे सेवन करत असताना मिळून आले होते.