गुहागर:- तालुक्यातील धोपावे तरीबंदर येथे फेरीबोटीजवळ १४ ऑगस्टला सापडलेल्या नवजात बालिकेचा मृत्यू झाला आहे. दि. १६ ऑगस्टला प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा रुग्णालयातून अधिक उपचाराकरिता या बालिकेला अन्य रुग्णालयात हलविण्यात आले होते.
दरम्यान, नवजात अर्भकाच्या मातेचा आणि पालकांचा शोध अद्यापही सुरुच आहे. जो कोणी या घटनेसंदर्भात माहिती देईल त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे जागरूक नागरिकांनी पुढे येऊन माहिती द्यावी, असे आवाहन गुहागर पोलीसांनी केले आहे.









