Thursday, June 18, 2026
spot_img
Home खेड तळवटपाल येथे जंगलात तरुणाचा संशयास्पद मृत्यू

तळवटपाल येथे जंगलात तरुणाचा संशयास्पद मृत्यू

खेड:- खेड तालुक्यातील तळवटपाल येथे एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह जंगलात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुरेश पांडुरंग आखाडे (रा. तळवटपाल, गणेशवाडी) असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश आखाडे हे शुक्रवारी दि. २४ एप्रिल रोजी सकाळी ‘कामाला जातो’ असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र, सायंकाळपर्यंत ते घरी परतले नाहीत. दरम्यान, तळवटपाल-देऊळवाडी येथील डांबरी रस्त्याच्या खालील बाजूस असलेल्या ‘लेंडवहाळ’ नावाच्या जंगलमय भागात त्यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला.

​घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ही घटना २४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. खेड पोलिसांनी रात्री १२ वाजता बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे या प्रकरणाची नोंद केली आहे.