तरुणाच्या अकाउंटवरुन परस्पर काढले 76 हजार; गुन्हा दाखल

गुहागर:- गुहागरात तरुणाच्या अकाउंटवरुन परस्पर 76 हजार 734 रुपयांची रक्कम काढल्याची घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद दिलीपकुमार रामजन्म सिंह (41, झारखंड, सध्या अंजनवेल गुहागर) याने पोलीस स्थानकात दिली. ही घटना 15 ते 16 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 वा. च्या सुमारास घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीपकुमार सिंह यांना कोणताही अनोळखी कॉल आलेला नाही तसेच त्यांनी कोणालाही बँकेची डिटेल्स दिलेली नाहीत किंवा त्यांच्या मोबाईलवर ओटीपी आलेला नाही असे असतानाही त्यांच्या अ‍ॅक्सिस बँकेतून अकाउंटवरुन अज्ञाताने 76 हजार 734 रुपयांची रक्कम परस्पर काढून घेतली. सिंह यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातावर भादविकलम 420, 419 माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (क) (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे.