रत्नागिरी:- रायगड जिल्ह्यातील चिंचवली गावचे रहिवासी असलेल्या वाहनचालक अक्षय अनंत शिंदे (वय २२) यांच्यावर अपघातप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आस आहे.
शिंदे आपल्या मोपेडवर यातील संतोष घवाळी (४७), महेंद्र घवाळी (दोन्ही रा. डोर्ले) यांना मागे बसवून दाभिळ आंबेरे ते डोर्ले असे जात होते. डोर्ले हद्दीजवळ तीव्र उतारावर भरधाव वेगात चालवून अपघात करून गाडीवर मागे बसलेले संतोष देऊ घवाळी (रा. डोर्ले) यांच्या मृत्यूस आणि स्वतःच्या व महेंद्र सहदेव घवाळी (रा. डोर्ले, ता. जि. रत्नागिरी) यांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत झाला. म्हणून पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला. ही घटना २६ जानेवारी २०२३ ला रात्री घडली होती. त्यामध्ये संतोष घवाळी गंभीररीत्या जखमी झाले. मुंबई येथील दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.









