Sunday, June 28, 2026
spot_img
Home रत्नागिरी डोक्याला मार लागून जखमी झालेल्या अनोळखी इसमाचा मृत्यू

डोक्याला मार लागून जखमी झालेल्या अनोळखी इसमाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील प्रमोद महाजन क्रिडा संकूल समोर पडून जखमी झालेल्या अनोळखी पुरुषाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. ही घटना मंगळवारी (ता. २३) सायंकाळी पाचच्या सुमारास निदर्शनास आली. या अनोळखीचे नाव गाव पत्ता समजून येत नाही. त्याचे अंदाजे वय ४० ते ५० आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनोळखी हा शहरातील प्रमोद महाजन क्रिडा संकूलच्या समोरिल जागेत पडून डोक्याला दुखापत झालेल्या स्थितीत आढळला. त्याला १०८ रुग्णवाहिके उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या अनोळखी बाबत अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.