Saturday, May 16, 2026
spot_img
Home रत्नागिरी झाडावरुन पडून कोतवडे येथील वृद्ध जखमी

झाडावरुन पडून कोतवडे येथील वृद्ध जखमी

रत्नागिरी:- रातांबीच्या झाडावर चढून फांद्या तोडत असताना वृद्ध पडला. त्याला मुका मार लागला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरेश आबा मांडवकर (वय ६३, रा. कोतवडे, धामेलीवाडी, रत्नागिरी) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १५) सकाळी दहाच्या सुमारास कोतवडे येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरेश मांडवकर हे सकाळी रातांबीच्या झाडाच्या फांद्या तोडत असताना झाडावरुन पडले. त्यांना मुकामार लागला. उपचारासाठी नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.