संगमेश्वर:- तालुक्यातील कोडगाव – मुरलीधरआळी (ता. संगमेश्वर) येथे झाड तोडल्याच्या वादातून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली. संशयितासह दोन महिलांविरुद्ध देवरूख पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. नीलेश बळीराम शेलार व अन्य दोन महिला असे संशयित आहेत. सदर घटना सोमवारी (ता. ७) सायंकाळी साडेचारच्या सुमारास कोंडगाव- मुरलीधरआळी येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदेश विजय पांचाळ यांच्या घराशेजारी असणारे फणसाचे झाड तोडल्यावरून पूर्वी वाद झाला होता. याबाबत फिर्यादी व त्यांची आई-बहीण, पत्नी असे विचारणा करण्यासाठी गेले असता वादविवाद झाले व फिर्यादी यांचे कुटुंबीयांना घरी नेत असताना संशयितांनी शिवीगाळ करून हाताने मारहाण केली तसेच ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संदेश पांचाळ यांनी देवरूख पोलिसात तक्रार दिली.









