जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प स्थळाच्या पाहणीसाठी फ्रान्समधील टीम उद्या रत्नागिरीत

रत्नागिरी:- जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प स्थळाची पाहणी करण्यासाठी २६ मे रोजी फ्रान्सहुन एक टीम दाखल होणार आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासोबत सहयोगी म्हणून काम करणाऱ्या कंपनीची ही टीम आहे. न्युक्लिअर पॉवर कार्पोरेशनकडून याबाबतची माहिती कळविण्यात आली आहे. प्रकल्पस्थळाची पाहणी हा या भेटीचा उद्देश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली.

फ्रान्सची ही टीम भारतात सफरीसाठी आली आहे. २५ मे रोजी ती टीम रत्नागिरीत दाखल होणार आहे. स्थानिकांनी जैतापूर अणुऊर्जा प्रक्लपाला तीव्र विरोध केला. स्थानिकांच्या भुमिकेला शिवसनेने पाठिंबा दिल्याने हा लढा अधिक तीव्र झाला. वादात अडकलेल्या या मोठ्या प्रकल्पात सहा न्यूक्लिअर रिऍक्टर बसवण्यास केंद्र सरकारनं तत्वतः मंजूरी दिल्याची माहिती काही महिन्यांपूर्वी राज्यसभेत देण्यात आली होती. त्यामुळे रखडलेला जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फ्रान्सच्या तांत्रिक सहकार्यातून १ हजार ६५० मेगावॅट क्षमतेचे सहा न्यूक्लीअर रिऍक्टर लावण्यास मंजुरी देण्यात आल्याने ९ हजार ९०० मेगावॅट क्षमतेचा हा देशातला सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प ठरणार आहे.

जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे हा अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. अर्थात स्थानिकांनी याला प्रचंड विरोध करत मोठं आंदोलन देखील उभारलं होतं. शिवसेनेनं देखील स्थानिकांच्या बाजूनं कौल देत आंदोलनाला साथ दिली. पण, त्यानंतर देखील गोष्टी हळहळू पुढे सरकत राहिल्या. सध्या या ठिकाणी प्रकल्पासाठी जमिन अधिग्रहित केली गेली असून संरक्षण भिंत देखील उभारली गेली आहे. पण, काम मात्र अद्याप अपेक्षित अशी गती घेतलेली नाही. मात्र त्यानंतर देखील आता या प्रकल्पाची चर्चा सुरू झाली आहे. फ्रान्सची एक टीम जैतापूर प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी गुरूवारी येणार आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासोबत सहयोगी म्हणून काम करणाऱ्या कंपनीची ही टीम आहे. उद्या ती रत्नागिरी दाखल होणार असून २६ मे रोजी प्रकल्पस्थळाला भेट देणार आहेत. मात्र याला विरोध होण्याच्या शक्यतेने त्यांनी स्थानिक पोलिसांकडे संरक्षण मागितले आहे. त्यामुळे पोलिस संरक्षणात ही टीम पाहणी करणार आहे.