Tuesday, October 6, 2026
spot_img
Home गुन्हेगारी जुवाटी येथे तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

जुवाटी येथे तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

राजापूर:- तालुक्यातील जुवाटी गावात भावोजींच्या घरासमोर उभा असलेल्या एका ३७ वर्षीय तरुणावर पाठीमागून येऊन कोयत्याने प्राणघातक वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​    मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी किशोर दिवाकर मयेकर (वय ३७, सध्या रा. विरार वेस्ट, मुळ रा. जुवाटी, ता. राजापूर) हे २ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास आपल्या भावोजींच्या घरासमोरील फणसाच्या झाडाखाली भावोजींच्या मित्रांसोबत उभे होते. यादरम्यान, आरोपी स्वप्निल अशोक बिर्जे (वय ४०, रा. बेनगी, पो. आडिवरे, ता. राजापूर) याने तिथे अचानक पाठीमागून येऊन फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगटावर कोयत्याने वार करत गंभीर दुखापत केली.

​   या हल्ल्यात जखमी झालेले किशोर मयेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजापूर पोलीस ठाण्यात ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी स्वप्निल बिर्जेविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११७(१), ११५(२) तथा जुन्या कायद्यान्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस हवालदार अधिक तपास करत आहेत.