खेड:- जून्या भांडणाच्या कारणावरुन पती-पत्नीला घरात घुसून मारहाण करुन दुखापत केल्याची घटना खेड तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रघुनाथ धोंडू वनगुले हे संध्याकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घरासमोरील हॉलमध्ये पूजेसाठी बसले होते. त्यावेळी त्यांचा चुलत भाऊ दिलीप भागोजी वनगुले हा पत्नीसह तेथे आला. त्या दोघांनी कोणत्या तरी जून्या भांडणाच्या कारणावरुन अचानक घराच्या अंगणात घुसून त्यांच्या पत्नीला ‘xxx बाहेर ये, तुला दाखवतो’, असे म्हणत शिविगाळ करुन त्याच्या पत्नीने हाताने मारहाण करुन ढकलून दिले. तसेच दिलीपने अंगणातील दांडका घेऊन रघुनाथ यांच्या हातावर मारुन दुखापत केली आहे.









