रत्नागिरी:- सोमवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात जवळपास 214 तपासण्यांमध्ये केवळ 7 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर तब्बल 24 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. नव्याने एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 24 तासात 24 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 81 हजार 728 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 96.84 टक्के आहे. नव्याने 7 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 84 हजार 396 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 2 हजार 533 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 41 तर संस्थात्मक विलगीकरणात 69 रुग्ण उपचार घेत आहेत.









