जिल्ह्यात नव्याने 13 जण कोरोना पॉझिटिव्ह; 3 मृत्यूची नोंद

रत्नागिरी:- मंगळवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 1 हजार 124 अहवालांपैकी 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर कोरोनाने तीन रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 10 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 76 हजार 338 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून  96.70 टक्के आहे. नव्याने 13 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 78 हजार 947 इतकी झाली आहे. 

 जिल्ह्यात कोरोनाने तीन रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 478 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.14 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 76 तर संस्थात्मक विलगीकरणात 55 रुग्ण उपचार घेत आहेत.