Thursday, May 14, 2026
spot_img
Home रत्नागिरी आरे-वारे समुद्रात दोघे पर्यटक बुडाले; एकाचा मृत्यू, एकाला वाचवण्यात यश

आरे-वारे समुद्रात दोघे पर्यटक बुडाले; एकाचा मृत्यू, एकाला वाचवण्यात यश

रत्नागिरी:- रत्नागिरीतील आरे वारे समुद्रात दोघे पर्यटक बुडाले. रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला असू एकाला स्थानिक ग्रामस्थ आणि येथील पोलिस पाटील आदेश कदम यांनी वाचवत जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

संतोष शशिकांत भानुशाली (पालघर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर सुयोग राजेश भानुशाली (विरार) असे बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. पालघर येथून हे कुटुंब रविवारी सकाळी आरे वारे येथे दाखल झाले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने यातील दोघे समुद्रात बुडाले. यातील एकाचा मृत्यू झाला तर एकाला वाचवण्यात यश आले.