रत्नागिरी:- जिल्ह्यात सलग तीन दिवस पाचशेवर कोरोना बाधित आढळले आहेत. आतापर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण मागील 24 तासात सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाल्याचे चित्र आहे. आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 555 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या 555 पैकी 348 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 207 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 555 नवेे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 15 हजार 630 झाली आहे. आज 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा स्फोटच झाला. आतापर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात सापडू लागले आहेत. 24 तासात 555 रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 15 हजार 630 वर जाऊन पोहचली आहे. रविवारी आलेल्या अहवालात 348 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 207 रुग्ण अॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत.
मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 10 रुग्णांचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 449 इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.87 % आहे. दरम्यान, आज 255 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 11910 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 76.19 टक्के आहे.
मागील चोवीस तासात जिल्ह्यात 1514 कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असून आतापर्यंत एकूण 1,14,056 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील आज सापडलेल्या 555 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 160, दापोली 26, खेड 72, गुहागर 52, चिपळूण 131, संगमेश्वर 61, मंडणगड 9, राजापूर 20 आणि लांजा तालुक्यात 24 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 12.05% आहे.









