जिल्ह्यात एकाच दिवशी 818 शाळांची कसून तपासणी

रत्नागिरी:- जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे..जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांची ‘पटपडताळणी’ मोहीम एकाच वेळी हाती घेण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात ८१८ शाळांची तपासणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. विद्यार्थी संख्येचा आकडा फुगवून सांगणाऱ्या शाळांवर नियंत्रण मिळवणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

शिक्षण विभागाच्या वतीने ही मोहीम अत्यंत गोपनीय आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यात आली. सकाळी ८ ते १२ या वेळेत शिक्षण विभाग, ‘डाएट’चेअधिकारी, समग्र शिक्षण व योजना विभागातील अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या पथकांनी विविध शाळांना भेटी दिल्या.

असल्यामुळे पहिल्या दिवशी माहिती ऑनलाईन भरता आली नाही. त्यामुळे ६५१ शाळांची माहिती ऑफलाईन पद्धतीने नोंदवण्यात आली, तर १६७शाळांची माहिती संकलित करण्यात आली आहे. मोजणी करून प्रत्येक वर्गातील एका विद्यार्थ्याचे छायाचित्रही काढण्यात आले आहे, जेणेकरून पारदर्शकता टिकून राहील.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही तपासणी केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसून तीन टप्प्यांत पार पडणार आहे. १५ एप्रिल रोजी ९०० शाळा, २२ एप्रिल ९२६ शाळा अशा एकूण २,६२६ शाळा तपासल्या जाणार आहेत.

अनेकदा शासनाकडून मिळणारे अनुदान लाटण्यासाठी विद्यार्थी संख्येची आकडेवारी फुगवून सांगितली जाते. हा ‘आकडेवारीचा खेळ’ थांबवण्यासाठी प्रत्यक्ष शाळेत जाऊन हजेरी घेण्याचे निर्देश शासन स्तरावरून देण्यात आले आहेत. जे विद्यार्थी गैरहजर आढळले आहेत, त्यांची नोंद स्वतंत्रपणे लॉगिनमध्ये करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, ही पटपडताळणी महत्त्वाच्या विषयांच्या पेपरच्या दिवशीच आयोजित करण्यात आली आहे.
इयत्ता ११ वी मराठी, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांची वार्षिक परीक्षा. इयत्ता ९ वीः मराठी, गणित व इंग्रजी विषयांचे पेपर. इयत्ता २ री ते ८ वी: याच कालावधीत पटपडताळणी चाचणी घेतली जात आहे.