रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण स्थिर आह. मागील 24 तासात 538 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 339 तर अँटीजेन चाचणी केलेल्या 199 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 42 हजार 259 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आज तब्बल 17 मृत्यूंची नोंद झाली आहेत.
जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेल्या कडक लॉकडाउनच्या कालावधीत प्रत्येक दिवशी 500 पेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. लॉकडाऊन नंतरच्या पहिल्या दिवशी देखील जिल्ह्यात 538 रुग्ण सापडले आहेत. एकूण 3 हजार 694 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यापैकी 538 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 17 मृत्यूंची नोंद झाली आहे आतापर्यंत एकूण 1 हजार 445 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर 3.41% आहे.
जिल्ह्यात गेल्या सोमवारी 395 तर मंगळवारी 655, बुधवारी 610, गुरुवारी 389 तर शुक्रवारी 590, शनिवारी 582, रविवारी 567 तर सोमवारी 429, मंगळवारी 567, बुधवारी 525 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. गुरुवारी नव्याने 538 रुग्ण सापडले असून यापैकी आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 1 हजार 770 पैकी 339 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 1 हजार 924 पैकी 199 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.









