रत्नागिरी:-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकार्यांनी व्यावसायिकांसाठी नियमावली घालून दिली होती. जिल्हाधिकार्यांनी घालून दिलेल्या या आदेशाचे उल्लंघन करुन रात्री उशिरापर्यंत दुकाने तसेच हॉटेल उघडी ठेवणार्या चिपळुणातील 9 व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यामध्ये अनिल सखाराम गुरव (41, कामथे – हॉटेल सुरु ठेवले), राकेश काशिराम गुरव (33, कामथे, हरेकरवाडी, चिपळूण – हॉटेल सुरु ठेवले), लक्ष्मण सखाराम महाडिक (52, चिपळूण, पागनाका- हॉटेल चालू ठेवले), महेंद्र चंद्रकांत जावळे (27, रा. कामथे जावळेवाडी, चिपळूण – पान शॉप सुरु ठेवले), मानस मनोज शिरगावकर (27, रा. खेड,वाणीपेठ, सध्या चिपळूण – धाबा चालू ठेवला), विवेक संभाजी दाभोळकर (42, रा. खेर्डी, विठ्ठलवाडी, चिपळूण – स्नॅक्स व चायनिज सुरु ठेवले), ज्ञानेश्वर कृष्णा कदम (47, खेंड, कन्याशाळेसमोर, चिपळूण – चायनिज सेंटर सुरु ठेवले), विनोद विष्णू तटकरे (45, पागमळा, चिपळूण – आइस्क्रिम पार्लर सुरु ठेवले), आफताब मुखतार अहमद दिवेकर (20, रा. गोवळकोट, चिपळूण – हॉटेल सुरु ठेवले) अशा एकूण 9 जणांवर भादवि कलम 269, 270 नुसार गुन्हे दाखल केले आहेत.









