जिल्हा परिषदेच्या 50 विद्यार्थ्यांनी अनुभवली इस्रो भेटीची अनुभूती

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या पाथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी यावर्षी देखील भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्त्रो’ भेटीची पत्यक्ष अनुभूती घेतली. आतापर्यंत पाथमिक च्या विद्यार्थ्यांनी पुस्तकातील वैज्ञानिक गोष्टी वाचल्या होत्या. पण त्या गोष्टी इस्त्रो येथील भेटीत 50 विद्यार्थ्यांनी पत्यक्षपणे अनुभवल्या आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

अंतराळ संशोधनाबाबत जिज्ञासा निर्माण व्हावी यासाठी नासा (अमेरिका) व इस्रो (भारत) येथे जिल्हा परिषद पाथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना सफर घडविण्यासाठी जिल्हा परिषदमार्पत मुलांची निवड करण्यात आली. त्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यापूर्वीच सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिलेले होते. त्यानुसार जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद झाली. जिल्हाधिकारी एम.देवेंदरसिंह, जि.प.सीईओ किर्तीकिरण पुजार यांचे मार्गदर्शन लाभले. नासा व इस्त्रो भेटीसाठी जि. प. पशासनस्तरावर केंद्रस्तरावर विद्यार्थ्यांची चाळणी परिक्षा घेण्यात आली. त्यातून नासा-इस्त्रो संस्थांना भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आले. त्यासाठी यावेळेस जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या चाळणी परिक्षेत एकूण 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यातील 20 मुले नासा दौऱयासाठी निवडली गेली आहेत.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नासा व इस्त्रो या विज्ञान संशोधन संस्थांना विद्यार्थ्यांना भेटी घडविण्यात येणार आहे. नुकतीच इस्त्रो या अंतराळ विज्ञान संस्थेला भेटी देण्याचा दौरा घेण्यात आला. रत्नागिरी येथून बसने 14 जानेवारी रोजी निवड झालेल्या विद्यार्थी गोवा येथे रवाना झाले. त्याठिकाणहून विमानाने या साऱयांनी चेन्नई अशी सफर घडवण्यात आली. पाथमिकच्या या विद्यार्थ्यांची या पवासासाठी पथमच विमान सफर होती. चेन्नई येथे गेल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पीडीआर सायन्स टेक्नॉलॉजी या संस्थेत भेट घडवण्यात आली. त्यानंतर त्रेवेंद्रम येथे पवास घडला. 17 जानेवारी रोजी इस्त्रो या संस्थेत प्रत्यक्ष भेट देण्यात आली.
या साऱया पवासात विद्यार्थ्यांसमवेत जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, उपाशिक्षणाधिकारी संदेश कडव, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, 4 शिक्षक अशी टिम दिमतीला होती. या भेटीत भारताच्या अवकाश तंत्रज्ञानातील सुवर्ण इतिहासाची अनुभूती विद्यार्थ्यांनी घेतली. भारताच्या विविध अवकाश मोहिमा, सॅटेलाईट पक्षेपण, रॉकेट लाँचिंग या गोष्टी पत्यक्ष पाहून विद्यार्थी पुरते भारावून गेले. इस्त्रोंअंर्गंत तेथील विविध संस्थांना भेटी देण्यात आल्या. अवकाश संशोधनातील विविध बाबी, स्पेस म्युझियम, भारतीय अवकाश यान पगती, वेगवेगळ्या सॅटेलाईट या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवल्या.