Friday, May 15, 2026
spot_img
Home रत्नागिरी भाटीमिऱ्या येथे बेडवरुन पडलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू

भाटीमिऱ्या येथे बेडवरुन पडलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरानजीकच्या भाटीमिऱ्या येथील वृद्ध महिला बेडरुममध्ये बेडवरुन पडली. अधिक उपचारासाठी तिला सीपीआर कोल्हापूर येथे दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. विजया अजित पारकर (वय ६८, सध्या रा. जुना दत्ता मंदिर भाटीमिऱ्या, रत्नागिरी) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २४) सायंकाळी सहाच्या सुमारास सीपीआर हॉस्पिटल-कोल्हापूर येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विजया पारकर ही घरातील बेडरुम मधील बेडवरुन पडून जखमी झाली. तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी तात्काळी तिला सीपीआर हॉस्पिटल येथे हलविण्यात आले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.