जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी वैदही रानडे

रत्नागिरी:- जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी वैदही रानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती कुमार पुजार यांची बदली झाल्यानंतर त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे.

वैदेही रानडे या एमएसआरडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या. रत्नागिरीचे सीईओ किर्ती किरण पुजार यांची बढतीने धारशीव येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते. या पूर्वी वैदही रानडे यांनी रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी अशा विविध पदांवर काम केलेले आहे.