जिल्हा परिषद अधिकारी, पदाधिकाऱ्यांना मिळणार नव्या कोऱ्या गाड्या

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषद अधिकारी आणि पदाधिकारी यांची गाड्यांविना होणारी गैरसोय आता दूर होणार आहे. नव्या गाड्या घेण्यास शासनस्तरावर मंजुरी मिळणार असून लवकरच अधिकारी आणि पदाधिकारी यांच्याकडे या गाड्या सुपूर्द करण्यात येणार आहेत. 

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या गाड्या नादुरुस्त स्थितीत असल्यामुळे त्याचा परिणाम जिल्ह्याच्या विकासकामांवर होत होता. गाड्या नादुरुस्त असल्याने काही वेळा सभापतींना दौऱ्यावर असताना रस्त्यात देखील अडकून पडायला होत होते. त्या अनुषंगाने श्री विक्रांत भास्कर जाधव यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यांना नवीन गाड्यांच्या मंजुरी आपण शासनाकडून घेऊन येऊ असा शब्द दिला होता. केवळ चुकीची टिपणी लिहिल्यामुळे सदरचा प्रस्ताव बरीच वर्ष रखडला होता . शासन स्तरावर योग्य ती दखल घेण्यात येत नव्हती ही बाब लक्षात आल्यानंतर श्री विक्रांत भास्कर जाधव यांनी याबाबत थोडी कडक भूमिका घेतली आणि त्या अनुषंगाने त्यांनी शासन स्तरावर आणि आयुक्त स्तरावर व्यक्तिशः प्रयत्न करून आज रोजी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अधिकारी व पदाधिकारी यांना नवीन गाडी घेण्यासाठीची शासनस्तरावरून मंजुरी अध्यक्षांच्या विशेष प्रयत्नांमुळे मिळाली आहे.