रत्नागिरी:- फेसबुक सोशल मिडियावरुन शेअर मार्केटची माहिती घेताना डीमॅट अकाऊंट ओपन करण्यास सांगून शेअर मार्केट मधील कमी वेळात जास्त नफ्याचे अमिष दाखून १७ लाख ८४ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल गुप्ता व जेनीस मेहता (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना २० मे ते १८ जून २०२४ या कालवधीत घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी दिनेश मोहनलाल जैन (वय ६०, रा. अमज्योत, थिबा पॅलेस, रत्नागिरी) हे फेसबुक सोशल मिडियावरुन शेअर मार्केटबाबतची माहिती घेत असताना एम-११ मॅक्झीमा फायनान्स सेक्युरिटीज् या नावाच्या जाहिरातीवरुन दिनेश जैन यांनी शेअर मार्केट संदर्भातील व्हॉटसॲप ग्रृप जॉईन केला या ग्रृपचे ॲडमीन असलेल्या संशयित कुणाल गुप्ता व जेनीस मेहरा या नावाच्या व्यक्तींना व्हॉटसॲपच्या माध्यमातून जैन यांच्याशी संपर्क साधून लिंकद्वारे डिमॅट अकाऊंट ओपन करण्यास सांगुन विविध आयपीओ व शेअर मार्केटमध्ये कमी वेळात जास्त नफ्याचे अमिष दाखवून पैसे गुंतविण्यास भाग पाडून संशयितांनी त्यांची १७ लाख ८४ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी जैन यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.