रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी-जयगड रस्त्यावरील जाकादेवी येथे टेम्पो उलटून झालेल्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चंद्रकांत लक्ष्मण डांगे (४२) व आयुष बाळकृष्ण डांगे (१४, ऱा हातखंबा डांगेवाडी) अशी जखमींची नावे आहेत़. ही घटना सोमवारी (ता. ११) दुपारच्या सुमारास घडल़ी.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत व आयुष डांगे हे सोमवारी टेम्पोने निवळी-जयगड रस्त्याने गणपतीपुळेकडे जात होत़े दुपारच्या सुमारास जाकादेवी येथे चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो रस्त्याकडेला उलटल़ा. या अपघातात चंद्रकांत व आयुष डांगे यांना गंभीर स्वरुपाची दुखापत झाल़ी. दोघांनाही रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होत़े. दरम्यान आयुष याला अधिक उपचारासाठी अन्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आह़े.









