जाकादेवी बँक दरोडा; बँक कर्मचारी गुरवच्या शरीरात होती बंदुकीची गोळी

रत्नागिरी:- जाकादेवी सेंट्रल बँक दरोडा खटल्यात सरकारी पक्षाकडून युक्तीवाद करण्यात येत आह़े यावेळी सरकारी पक्षाचे वकील पुष्पराज शेट्ये यांनी सांगितले की, दरोड्याच्यावेळी जखमी सुरेंद्र गुरव याच्यावर कोल्हापूर येथे शस्त्रकिया करण्यात आली होत़ी यावेळी गुरव याच्या शरीरात असलेली बंदुकीची गोळी बाहेर काढण्यात आल्याची साक्ष कोल्हापुरातील वैद्यकीय अधिकाऱयांनी दिली. त्यामुळे गुरव याला झालेली जखम ही बंदुकीच्या गोळीमुळे झाल्याचे स्पष्ट होत आह़े हा आरोपींच्या विरूद्ध सबळ पुरावा असल्याचे ऍड़ पुष्पराज शेट्ये यांनी न्यायालयापुढे सांगितल़े  
 

गुरव याच्या शरीरातून गोळी काढण्यात आली, त्यावेळी पेलिसांकडून पंचनामाही करण्यात आला होत़ा गुरव याच्या शरीरातून काढलेली गोळी ही आरोपी यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या बंदुकीतूनच झाडली होती, असेही समोर आले आह़े तसेच पत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी गुरव याला आरोपीने गोळी मारल्याबद्दल न्यायालयापुढे दिलेली साक्ष व पत्यक्ष गुरूव याला झालेली जखम हे एकमेकांना जुळून येत आह़े त्यामुळे आरोपींनी गुन्हा केल्याचे सिद्ध होत असल्याचे ऍड़ शेट्ये यांनी सांगितल़े  
 

रत्नागिरी सत्र न्यायाधीश विनायक राजाराम जोशी यांच्या न्यायालयात हा खटला चालवण्यात येत आह़े या खटल्यात एकूण 35 साक्षीदारांनी आपला जबाब न्यायालयापुढे नोंदवला आह़े यातील 2 साक्षीदार हे सरकारी पक्षाला फितूर (फुटले) झाले आहेत़ यापूर्वी या खटल्यात सरकारी पक्षाकडून युक्तीवाद करण्यात  आला होत़ा तत्कालीन सत्र न्यायाधीश एमक्यूएसम शेख यांची अन्य ठिकाणी बदली झाली. यामुळे या खटल्याचा पुन्हा नव्याने युक्तीवाद करण्यात येत आह़े मागील 9 वर्षापासून चालणाऱया या खटल्यात सरकारी पक्षाकडून युक्तीवाद करण्यात येत आह़े यानंतर बचाव पक्षाकडूनही आपली बाजू मांडली जाणार आह़े  
 

जाकादेवी सेंट्रल बँक येथे 28 नोव्हेंबर 2013 रोजी दरोडा टाकण्यात आला होत़ा यावेळी संशयित आरोपींनी बँकेतील कर्मचारी संतोष चव्हाण (ऱा धामणसे) याला गोळी घालून ठार केले होत़े तर अन्य सुरेंद्र गुरव हा गंभीर जखमी झाला होत़ा तसेच संशयित आरोपी हे बँकेच्या तिजोरीतील सुमारे 6 लाख 88 हजार रुपयांची रक्कम घेऊन आरोपी खासगी वाहनाने फरारी झाल्याचा आरोप संशयित 6 जणांवर ठेवण्यात आला होत़ा या आरोपींमध्ये राजेंद्र राजावत (25, रा. कल्याण), हरिष गोस्वामी (25, रा.कल्याण), प्रथमेश सावंत (18, रा. जाकादेवी), शिवाजी भिसे (25, रा. कल्याण), निखिल सावंत (24, रा. डोंबिवली) आणि प्रशांत शेलार (28, रा. मुंबई) यांचा समावेश आहे
 

जाकादेवी बँक दरोड्याच्या घटनेमध्ये गोळी लागून गंभीर जखमी सुरेंद्र गुरव याला पथम उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय व नंतर कोल्हापूर येथे हलवण्यात आले होत़े यावेळी गुरव याच्यावर कोल्हापूर येथील रूग्णालयात शस्त्रकिया करण्यात आल़ी  त्याच्या शरीरात घुसलेली गोळी डॉक्टरांनी बाहेर काढल़ी  शरीरातून बाहेर काढण्यात आलेल्या गोळीमुळे गुरव याला झालेली जखम ही गोळी मारल्याने झाली होती, हे सिद्ध होत़े त्या संबंधी ऑपरेशन करणाऱया वैद्यकीय अधिकाऱयांच्या साक्षीचा उल्लेख ऍड़ पुष्पराज शेट्ये यांनी न्यायालयापुढे केल़ा  

  यापूर्वी झालेल्या युक्तीवादावेळी शेट्ये यांनी सांगितले की, जाकादेवी बँक दरोडा पकरणात मृत संतोष चव्हाण याचे कपडे जप्त करण्यात आले होत़े त्याच्या शर्ट व बनियनवर भोके असल्याचे स्पष्टपणे दिसत आह़े मृत संतोष चव्हाण यांच्या शरीरावरील बंदुकीच्या गोळीची जखम आह़े तसेच त्याच्या शर्ट, बनियनलाही भोक पडलेला आह़े त्यामुळे बंदुकीची गोळी त्याच्या शर्ट व बनियनमधून शरीरात गेल्याचे स्पष्ट होत आह़े तसेच गुरवच्या शरीरावर बंदुकीच्या गोळीमुळे झालेली जखम असून शर्टवर भोक असल्याचे दिसत आह़े शर्टवरील भोकामधूनच गोळी आत जावून शरीराला लागल्याचे स्पष्ट होत असल्याचे शेट्ये यांनी न्यायालयापुढे सांगितल़े