रत्नागिरी:- जाकादेवी सेंट्रल बँक दरोडा खटल्यात एकूण 35 साक्षीदारांनी आपला जबाब न्यायालयापुढे नोंदवला आह़े. यातील 2 साक्षीदार हे सरकारी पक्षाला फितूर झाले आहेत़. आता या खटल्याची पुढील सुनावणी 25 ऑगस्टला होणार आहे.
रत्नागिरी सत्र न्यायाधीश महम्मद कासीम शेख मुसा शेख यांच्या न्यायालयात हा खटला चालवण्यात येत आह़े. ॲड. शेट्ये यांनी गुरूवारी न्यायालयापुढे सांगितले की, जाकादेवी बँक दरोडा पकरणात मृत संतोष चव्हाण याचे कपडे जप्त करण्यात आले होत़े. त्याच्या शर्ट व बनियनवर होल असल्याचे स्पष्टपणे दिसत आह़े. मृत संतोष चव्हाण यांच्या शरीरावरील बंदुकीच्या गोळीची जखम आह़े. तसेच त्याच्या शर्ट, बनियनलाही होल पडला आह़े. त्यामुळे बंदूकीची गोळी त्याच्या शर्ट व बनियनमधून शरीरात गेल्याचे स्पष्ट होत आह़े. खटल्यातील कपडे जप्तीचा पंचनामा अत्यंत महत्वाचा पुरावा ठरत आह़े.
दरोड्याच्या घटनेत गोळी लागून गंभीर जखमी गुरव याच्यावर कोल्हापूर येथील रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल़ी. त्याच्या शरीरात घुसलेली गोळी डॉक्टरांनी बाहेर काढल़ी. ही गोळी बाहेर काढल्यानंतर पंचनामा करण्यात आल़ा. शरीरातून बाहेर काढण्यात आलेल्या गोळीमुळे गुरव याला झालेली जखम ही गोळी मारल्याने झाली होती, हे सिद्ध होत़े. त्या संबंधीची ऑपरेशन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षीचा उल्लेख ॲड. पुष्पराज शेट्ये यांनी न्यायालयापुढे केल़ा.
खटल्यातील मुख्य आरोपी राजेंद्र राजावत, शिवाजी भिसे व प्रशात शेलार यांनी पोलिसांना निवेदन दिले होत़े. त्यांच्या निवेदनानुसार दरोड्यातील पैसे, बंदूक व इतर मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला होत़ा. तसेच आरोपी प्रशांतने पळून जाण्यासाठी वापरलेल्या गाडीची बनावट नंबरप्लेट फुणगूस येथे फेकून दिला होत़ी. ही नंबरप्लेट त्याने दिलेल्या निवेदनानुसार, पोलिसांकडून जप्त करण्यात आल़ी. यामुळे आरोपींनी दिलेल्या या निवेदनामुळे सरकारी पक्षाची बाजू बळकट होत असल्याचे ॲड शेट्ये यांनी सांगितल़े. बँक दरोड्यावेळी प्रतिभा शिंदे या बँकेत कॅशियर म्हणून काम करत होत्य़ा. त्यांनी आपल्या साक्षीत 5 आरोपींना बँकेत प्रवेश करताना पाहिले होत़े तसेच आरोपीने बँक मॅनेजर कविश्वर यांच्या डोक्याला बंदूक लावून पैसे लुटल़े, असे त्यांनी पाहिल्याचे न्यायालयापुढे सांगितल़े. यावरून बँक मॅनेजर कविश्वर व कॅशियर शिंदे यांचा जबाब एकमेकांशी जुळत आह़े. तसेचे कॅशियर शिंदे यांनी आरोपी यांना न्यायालयापुढे ओळखले आह़े. ही बाबही या खटल्यात अत्यंत महत्वाची असल्याचे ॲड. शेट्ये यांनी न्यायालयापुढे सांगितल़े
जाकादेवी सेंट्रल बँक येथे 28 नोव्हेंबर 2013 रोजी दरोडा टाकण्यात आला होत़ा यावेळी संशयित आरोपींनी बँकेतील कर्मचारी संतोष चव्हाण (ऱा. धामणसे) गोळी घालून ठार केले होत़े. तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला होत़ा. तसेच संशयित आरोपी हे बँकेच्या तिजोरीतील सुमारे 6 लाख 88 हजार रुपयांची रक्कम घेऊन आरोपी खासगी वाहनाने फरारी झाले, असा आरोप संशयित 6 जणांवर ठेवण्यात आला होत़ा. या आरोपींमध्ये राजेंद्र राजावत (25, रा. कल्याण), हरिष गोस्वामी (25, रा. कल्याण), प्रथमेश सावंत (18, रा. जाकादेवी), शिवाजी भिसे (25, रा. कल्याण), निखिल सावंत (24, रा. डोंबिवली) व प्रशांत शेलार (28, रा. मुंबई) यांचा समावेश आह़े. जाकादेवी बँक दरोडा पकरणाला 9 वर्ष उलटून गेली असून दोन्ही बाजूकडील युक्तीवाद झाल्यानंतर निकाल अपेक्षित असल्याचे मानले जात आह़े. आता या प्रकरणात पुढील युक्तीवाद 25 ऑगस्ट रोजी होणार आह़े.









