जयस्तंभ येथे मटका जुगारावर पोलिसांचा छापा

रत्नागिरी:- शहरातील जयस्तंभ ते बसस्थानक रस्त्यावर बंद टपरीच्या आडोशाला विनापरवाना मटका जुगार अड्यावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह पोलिसांनी १ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोहसिन नुरमहंमद फणसोपकर (वय ४०, मुळ. राजीवडा नाका, सध्या मुरुगवाडा, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १०) दुपारी दीडच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जयस्तंभ ते बसस्थानक रस्त्यावर बंद टपरीच्या आडोशाला मटका जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती त्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई संशयिताकडून साहित्यासह १ हजार ७५० रुपयांची मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.