रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड गणेशवाडी ते बौद्धवाडी जाणाऱ्या रस्त्यावर विनापरवाना मटका जुगारावर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये साहित्यासह ३०० रुपयांची मुद्देमाल जप्त केला. जयगड पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शुभम प्रकाश चव्हाण (वय २९, रा. जुनी तांबट आळी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २६) साडे अकराच्या सुमारास बौद्धवाडी जाणाऱ्या रस्त्यावर निदर्शनास आली. पोलिसांनी केलेल्या कारवाई संशयित विनापरवाना मटक जुगार खेळ खेळत असताना सापडला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल पवन पांगरीकर यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









