जयगड मधील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न जिंदल कंपनीमार्फत लागणार मार्गी

पहिली यादी सादर; कंपनी प्रशासन देखील सकारात्मक 

रत्नागिरी:- जयगड पंचक्रोशीतील स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न निकाली लागणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत चर्चा केल्यानंतर प्रकल्पामध्ये स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे जे.एस.डब्लू कंपनीचे सी.एस.आर हेड श्री. अनिल दाधिज यांनी सांगितले.

शनिवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी नांदिवडे गावातील काही जमिन मालक ग्रामस्थ यांनी सीएसआर हेड अनिल दाधिज यांची भेट घेवून रोजगारासंबंधी चर्चा केली. कंपनीमध्ये लवकरच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे यावेळी कंपनी प्रशासनाकडून  सांगण्यात आले. जयगड पंचक्रोशीतील बेरोजगार ग्रामस्थ युवक-युवतींनी आपली माहिती संधी संदीप शिरधणकर, प्रीतम शिरधणकर यांचेकडे आणून दयावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

रोजगाराच्या संधी उपलब्ध असूनही आजपर्यंत कोणतीही यादी कपंनीकडे देण्यात आली नाही. अशी खंतही अनिल दाधिज यांनी व्यक्त केली. कोणतीही शंका मनात न घेता तसेच पक्षीय राजकारण न करता आपली माहिती देण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

या आवाहनाला प्रतिसाद म्हणून नांदिवडे ग्रामपंचायतच्या माजी सदस्य श्रीम. आर्या अमित गडदे यांनी पहिली यादी कंपनीच्या सीएसआर हेड विभागाकडे सादर केली आहे. लवकरच स्थानिक बेरोजगार ग्रामस्थांना कंपनीत सामावून घेतले जाईल असे सीएसआर विभागातर्फ सांगण्यात आले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या बेरोजगारी संबंधी कंपनीच्या सकारात्मक भूमिकेबद्दल नांदिवडेच्या माजी ग्रामपंचायत सदस्य सौ. आर्या गडदे यांनी सीएसआर हेड अनिल दाधिज यांचे आभार मानले आहेत. रोजगाराचा प्रश्न सुटणार त्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.