Wednesday, August 12, 2026
spot_img
Home गुन्हेगारी जमिनीच्या वादातून वृद्धाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

जमिनीच्या वादातून वृद्धाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

संगमेश्वर कासे बडेवाडी येथील घटना

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील कासे बडेवाडी येथे जमीन जुमल्याच्या जुन्या वादातून ८० वर्षीय वृद्धाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. माखजन बाजारपेठेत घडलेल्या या प्रकरणात वृद्ध फिर्यादीच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामचंद्र पांडुरंग गोताड (वय ८०, मूळ रा. कासे बडेवाडी, सध्या रा. दिवा, ठाणे) यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. गोताड आणि आरोपी हे एकमेकांचे शेजारी असून, त्यांच्यात पूर्वीपासून जमीन-जागेवरून वाद सुरू आहेत. दि. ०८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.०० वाजण्याच्या सुमारास ही घटना कासे ब्रीज बडेवाडी, ता. संगमेश्वर येथे घडली.

फिर्यादी रामचंद्र गोताड आणि आरोपी उमेश भागाराम घाणेकर हे माखजन बाजारपेठेत असताना, गोताड यांच्या मोबाईलमध्ये चुकून उमेश घाणेकर यांचा फोटो काढला गेला. या गोष्टीचा राग मनात धरून उमेश भागाराम घाणेकर याने वृद्ध फिर्यादी गोताड यांच्या पाठीवर, कमरेवर, गुडघ्यावर आणि पायावर बांबूच्या काठीने मारहाण केली, अशी माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.

दरम्यान, आरोपी दिनेश भारागाम घाणेकर आणि सरिता भागाराम घाणेकर यांनी फिर्यादींना शिवीगाळ करत “तुला ठार मारू” अशी गंभीर धमकी दिली. या मारहाणीत फिर्यादी रामचंद्र पांडुरंग गोताड हे जखमी झाले आहेत.

याप्रकरणी दि. ०४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी भारतीय दंड संहिता कायद्याचे गु.आर.क्र. १२२/२०२५ अंतर्गत कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.