रत्नागिरी:- शहरातील आयटीआय, नाचणे रोड येथे जमिनीच्या व पैशाच्या व्यवहाराबाबत बोलणीसाठी गेलेल्या प्रौढाला तिघांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. शहर पोलिस ठाण्यात तिन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील लिगनुरक (वय२६), सोनाली लिगनुरकर (वय ४५, दोघेही रा. देवरुख, ता. संगमेश्वर.), त्याचा मित्र (नाव गाव, माहित नाही) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना सोमवारी (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास आयटीआय-नाचणे रोड, रत्नागिरी येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुभाष मनोहर खाडे (वय ४०, रा. टेंभ्ये खाडेवाडी, रत्नागिरी) हे संशयितांकडे जमिनीच्या व पैशाच्या व्यवहाराबाबत बोलण्यासाठी नाचणे येथे गेले होते. त्यावेळी संशयितांनी शिवीगाळ करुन हाताच्या ठोशाने व लोखंडी रॉडने मारहाण केली. या प्रकरणी सुभाष खाडे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.