Thursday, July 30, 2026
spot_img
Home खेड जगबुडी नदीत कोसळलेला कंटेनर चार दिवसांनी आढळला

जगबुडी नदीत कोसळलेला कंटेनर चार दिवसांनी आढळला

धाडसी तरुणांनी देवणे परिसरात दोरीच्या सहाय्याने ठेवला बांधून

खेड:- तालुक्यातील भरणा पुलावरून जगबुडी नदीत कोसळलेला मँगीचा कंटेनर चार दिवसांनंतर सोमवारी खेड शहरालगतच्या देवणे परिसरात नदीत तरंगताना आढळून आला.

मुंबई-गोवा महामार्गावरील भरणा नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावरून २२ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा कंटेनर कोसळला होता. या भीषण अपघातानंतर चालक व वाहकाचा शोध घेण्यासाठी तसेच कंटेनर शोधण्यासाठी यंत्रणांकडून प्रयत्न सुरू होते, मात्र नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे तो दूरपर्यंत वाहून गेला होता.

सोमवारी देवणे परिसरात नदीत कंटेनर तरंगताना दिसतच ही माहिती परिसरात वेगाने पसरली आणि तो पाहण्यासाठी नागरіकांनी नदीकाठी मोठी गर्दी केली. कंटेनर आणखी पुढे वाहून जाऊ नये म्हणून काही धाडसी तरूणानी जिवाची पर्वा न करता नदीत उतरून दोरीच्या साहाय्याने कंटेनर बांधून ठेवला, ज्यांच्या या धाडसी कृतीचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे. या कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात मँगीचे पाऊच भरलेले होते आणि कंटेनर नदीत वाहत असताना त्यातील काही माल बाहेर पडून नदीपात्रात मँगीचे पाऊच सर्वत्र विखुरले होते. गोव्याहून मुंबईकडे निघालेला हा कंटेनर पुलावरून नदीत कोसळल्याने मोठा अपघात झाला होता.