रत्नागिरी:- तालुक्यातील कोळंबे-कुभांरवाडी येथील तरुणाच्या अचानक छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. सुरज सुरेंद्र साळवी ( वय २७, रा. कुंभारवाडी-कोळंबे, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १०) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरज हा सकाळी सातच्या सुमारास बाथरुमला गेला होता. अचानक त्याच्या छातीत दुखू लागल्याचे त्याने आतेला सांगितले. काही मिनिटातच त्याला चक्कर आली. उपचारासाठी त्याला रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









