साडेसहा टन युरिया तर सातशे टन जुआरी खत दाखल
रत्नागिरी:- खरीप हंगामासाठी आतापर्यंत जिल्ह्यासाठी युरियाचा एकूण साडेसहा हजार मे.टन तर जुआरी खताचा 700 मे.टन इतक्या खताचा पुरवठा झालेला आहे. रासायनिक खतांच्या गोणीवरील छापील किमतीपेक्षा कुणी जास्त किमतीने खत विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्राना मुळ रक्कमेनुसारच खतविक्री करण्याच्या सक्त सूचना दिल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी अजय शेंड्ये यांनी यांनी सांगितले आहे.
छपाई किमतीपेक्षा जादा किंमत आकारता येत नाही. रासायनिक खतांच्या काही ग्रेडच्या किमती वाढल्या असल्या तरी जुन्या दराची खते ( जुने दर छपाई असलेल्या बॅगा ) जुन्याच दराने शेतकऱयांना विकणे बंधनकारक आहे. तसेच शेतकऱ्यांना पावती देणे बंधनकारक आहे. कुणी विकेता जुन्या दरातील खत वाढीव किंमत आकारून विकत असल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ रत्नागिरी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांच्याकडे तक्रार करू शकता किंवा आपल्याकडे तक्रार करावी, असे जिल्हा परिषद कृषी अधिकारी अजय शेंडये यांनी सांगितले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात युरीया खताची मोठी मागणी आहे. सर्वसामान्य शेतकरी लॉकडाऊनमध्ये मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्रात जास्त दराने खत विक्री करत असतील तर त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याच्या सूचना आहेत. मात्र त्यासाठी लेखी तकार येणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात सर्व खत विकी केंद्र, ग्रामीण सोसायट्यांपर्यंत खत पुरवठा सुरू झालेला आहे. त्याठिकाणहून शेतकऱ्यांना खताची विकी सुरू करण्यात आलेली आहे. खत विकी केंद्राबाहेर खतांचे दरपत्रक लावण्याच्या सुचनाही सर्व विकेत्यांना करण्यात आल्या आहेत. खते विकत घेत असताना त्याची पावती घेणे शेतकऱ्यांना आवश्यक आहे. जेणेकरून होणारी फसगत टळण्यास मदत होणार असल्याचे कृषी अधिकारी अजय शेंड्ये यांनी सांगितले आहे.









