रत्नागिरी:- शहरातील छत्रपतीनगर येथील एका ऑफीसमधून 50 हजार रुपयांचा लॅपटॉप चोरीस गेला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय चौगुले असे संशयिताचे नाव आहे. ही घटना 15 सप्टेंबरला सायंकाळी 6 ते शनिवारी (ता. 23) सप्टेंबर 2023 सायंकाळी सहा या कालावधीत घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी
सुधीर काशिनाथ सुनेकर यांचे शहरातील छत्रपतीनगर येथील कारेकर निवास येथे ऑफीस आहे. संशयिताने या आठ दिवसांच्या कालावधीत त्यांचा एचपी कंपनीचा लॅपटॉप आणि माउस चोरुन नेला. याप्रकरणी सुनेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अक्षय चौगुलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.









