चिपळूण:- चिपळूण येथील परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. पोकलेनच्या साहाय्याने चौपदरीकरण करण्यात येत आहे. चौपदरीकरणाचा कामात उभ्या असलेल्या पोकलेनच्या डिस्प्ले युनिट दीड लाखाची चोरी झाली आहे.
याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील रामपती यादव (मुळ झारखंड, सध्या परशुराम) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद रोनित अनिल इनरकर (29, शिव बुद्रूक, खेड) याने दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 मार्च रोजी चौपदरीकरणाचे काम करत असताना पोकलेनचे ई.सी.यू. डिस्प्ले युनिट यादव याने चोरुन नेले. सोमवारी सुनील यादव याच्याविरुध्द चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.