चोरीच्या गुन्ह्यातील संशयित ‘स्थानिक गुन्हे अन्वेषण’च्या ताब्यात

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि त्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना दिल्या होत्या. या सूचनांनुसार कारवाई करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विविध चोरीच्या गुन्ह्यांमधील एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार २८ मे रोजी खेड शहरातील नवानगर लवेल येथे गस्त घालत होते. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन रामसहजीवन चव्हाण (वय २१, रा. आजगणी नवानगर लवेल, ता. खेड, जि. रत्नागिरी) हा मौजे लवेल, खेड येथे संशयीतरीत्या मिळून आला.

आरोपी सचिन रामसहजीवन चव्हाण याची अधिक चौकशी केली असता, तो खेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर १११/२०२५ भा.न्या.सं. कलम ३३१ (४), ३०५, ३ (५) आणि गुन्हा रजिस्टर नंबर ११८/२०२५ भा.न्या.सं. कलम ३३१ (४), ३०५, ३ (५) या दोन्ही गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीला पुढील कारवाईसाठी खेड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, या गुन्ह्याचा अधिक तपास खेड पोलीस ठाणे करत आहे.

ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक श्री. वाघ, पो.हवा. श्री. बाळू पालकर, पो.हवा. श्री. गणेश सावंत, पो.हवा. श्री. सत्यजित दरेकर, पो.हवा. श्री. विक्रम पाटील, पो.हवा. श्री. रमिज शेख आणि चा.पो.शी. श्री. अनिकेत नलावडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.