Wednesday, August 12, 2026
spot_img
Home गुन्हेगारी चोरी प्रकरणातील संशयितास उत्तरप्रदेशमधून ताब्यात

चोरी प्रकरणातील संशयितास उत्तरप्रदेशमधून ताब्यात

रत्नागिरी:- रत्‍नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने चोरी करुन पळालेल्या संशयिताला उत्‍तर प्रदेश राज्यातील किशनपूर तालुक्यातून ताब्यात घेतले.

रामहित निषाद असे ताब्यात घेण्या आलेल्या संशयिताचे नाव आहे. रामहित हा काही महिन्यांपूर्वी रत्‍नागिरीत मोल-मजूरीचे काम करत होता. त्‍याठिकाणी चोरी केल्याप्रकरणी त्‍याच्यावर रत्‍नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरी केल्यानंतर तो फरार झाल्यामुळे रत्‍नागिरी ग्रामीण पोलिस त्‍याचा शोध घेत होते. त्‍याचा शोध घेण्यासाठी ग्रामीण पोलिसांचे एक पथक उत्‍तरप्रदेशमधील किशनपूरला रवाना करण्यात आले होते. रविवारी या पथकातील पोलिस हेड काँस्टेबल गणपत झोरे आणि काँस्टेबल प्रशांत बंडबे या दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी किशनपूरमधील स्थानिक पोलिसांच्या मदतीने रामहित निषादला ताब्यात घेतले. त्‍यानंतर त्‍याची वैद्यकिय तपासणी करुन हे पथक रत्‍नागिरीला रवाना झाले. मंगळवारी ग्रामीण पोलिसांनी संशयिताला न्यायालयात हजर केले होते.