Sunday, May 3, 2026
spot_img
Home रत्नागिरी चिरेखाणीच्या इलेक्ट्रीक मशीनचा शॉक लागून तरुण जखमी

चिरेखाणीच्या इलेक्ट्रीक मशीनचा शॉक लागून तरुण जखमी

रत्नागिरी:- सापुचेतळे (ता. लांजा) येथे चिरेखाणीवर चिरे काढण्याच्या इलेक्ट्रीक वायरचा शॉक लागून तरुण जखमी झाला. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रत्नेश लाखण ठाकूर (वय २७, रा. सापुचेतळे, ता. लांजा. मुळ ः मध्यप्रदेश असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ११) सकाळी साडेनऊच्या सुमारास सापुचेतळे येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी तरुण रत्नेश ठाकूर हा महेंद्र चव्हाण यांच्या चिरेखाणीवर काम करत होता. त्यांच्या सोबत सुनिल गौंड, राम रतन गौड (सर्व रा. मध्यप्रदेश) हे देखील होते. सोमवारी सकाळी रत्नेश ठाकून कामवरिल चिरेखाणची इलेक्ट्रीक आडा मशीन चिरे काढत होता. मशीनच्या इलेक्ट्रीक वायरला उजव्या हाताने पकडून बाजूला केले असता त्याला जोरदार शॉक लागला. तात्काळ त्याला उपचारासाठी सापुचेतळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर उपचार सुरु असून या प्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास लांजा पोलिस अमंलदार करत आहेत.