दापोली:- तालुक्यातील मुरुड येथे घर दुरुस्तीचे काम सुरू असताना घरात घुसून एका महिलेला आणि तिच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ मे रोजी सकाळी ११.४० वाजता घडली असून, दापोली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
फिर्यादी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, २४ मे रोजी सकाळी त्यांच्या घराची खिडकी दुरुस्त करण्यासाठी कामगार आले होते. त्यावेळी आरोपी अज्ञानी विष्णू वरवडेकर, चैताली अज्ञानी वरवडेकर आणि अतुल सावंत (सर्व रा. मुरुड, ता. दापोली) यांनी फिर्यादीच्या घरात प्रवेश केला. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या पतीला घरातून बाहेर जाण्यापासून अडवले. इतकेच नव्हे तर, त्यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ करत दमदाटी केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, दापोली पोलीस अधिक तपास करत आहेत.