राजापूर:- तालुक्यातील कोळवणखडी येथील घरफोडी प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपीना सोमवारी येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याची मुदत बुधवारी २४ डिसेंबर रोजी संपणार आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुनील भीमा पवार (२७, रा. पारधी वस्ती, मोहा, जि. धाराशिव) आणि अजय उत्तरेश्वर गवळी (२०, रा. पिंपळवाडी, लाखनगाव, जि. धाराशिव) अशी आहेत.
दोघेही आरोपी धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील असून पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्हाची कबुली दिली असून यामध्ये सहभागी असलेल्या अन्य दोन साथीदारांची नावेही निष्पन्न झाली आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत..









